सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक :  नाशिक जिल्ह्यात (Nashik Dist.) एक धकादायक घटना घडली आहे. जन्मदात्या मुलानेच वडिलांचा खून केला आहे. वडिलांनी शेतात कामाला जाण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मुलाने वडिलांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे (nashik crime news). 


नेमकं काय घडलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साहेबराव मुरलीधर मालसाने असे मृत पित्याचे नवा आहे. त्यांचा मुलगा पप्पु उर्फ हिरामण साहेबराव मालसाने आणि गोरख साहेबराव मालसाने यांच्या सोबत दिंडोरी (Dindori) तालुक्यातील निगडोळ (Nigdol) येथे राहत होते. त्यांच्या घरासमोरच त्यांचे शेत आहे.  मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वडील साहेबराव यांनी त्यांचा मुलगा पप्पू उर्फ हिरामण याला शेतात कामाला जाण्यास सांगितले. यानंतर हिरामण याने  जवळच असलेल्या फावड्याने वडील साहेबराव यांच्यावर हल्ला (Attack) केला. हिरामण याने वडिलांच्या पाठीवर हातावर, डोक्यावर वार केल्याने साहेबराव गंभीर जखमी (Injured)  झाले होते. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत (Death) घोषित केल आहे. 


या कारणासाठी मुलाने केला वडिलांचा खून 


मंगळवारी 13 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी घरासमोर असलेल्या शेतात मुलाला काम करण्यासाठी जाण्यास सांगितले. शेतात काम करण्याची इच्छा कदाचित पप्पू उर्फ हिरामण याची नसावी. त्यामुळे पप्पू उर्फ हिरामण याचा राग अनावर झाला आणि त्याने शेतासाठी वापरल्या जाणाऱ्या फावड्याने वडील साहेबराव यांच्यावर हल्ला केला. यानंतर हिरामण फरार झाला आहे. 


सख्या भावाने दिली फिर्याद 


साहेबराव यांचा दुसरा मुलगा आणि पप्पू उर्फ हिरामण याचा सखा भाऊ (Brother) गोरख साहेबराव मालसाने याने पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली. गोरख याच्या फिर्यादीवरून (FIR) दिंडोरी पोलिसांनी पप्पू उर्फ हिरामण विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संशयित हिरामण उर्फ पप्पू पोलिसांच्या ताब्यात 


संशयित आरोपी हिरामणला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली असून न्यायालयात हजार केले असता हिरामण याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन दिवसात हिरामण याची चौकशी करून खून करण्याचे दुसरे काही कारण आहे का याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.