हळदी समारंभात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू
हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय.
नाशिक : हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय. पाचव्या मजल्यावरून चुलत बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम पाहात असताना एक तरूणीचा तोल जाऊन खाली पडली. ती थेट खाली उभ्या असलेल्या वडिलांच्या अंगावर पडली. यात विजय गोधडे यांचा जागीच मृत्यू झाला. सामनगावरोड परिसरात अश्विनी कॉलनीतील जयप्रकाशनगरमध्ये ही घटना घडली. सुनंदा गोधडे या मुलीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.