नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंच्या डोक्यावरची उमेदवारी रद्दतेची टांगती तलवार अखेर हटली आहे. राष्ट्रवादीनं त्यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. दराडे यांनी येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी न भरल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला होता. तसंच शपथपत्रात एक महत्वपूर्ण रकाना गहाळ केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णय प्रलंबित आहे. मात्र याला प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा दराडेंकडून करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी चूक ग्राह्य धरण्यात येत नसल्यानं दराडे यांची उमेदवारी रद्द होण्याची चिन्हं होती. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल राखून ठेवला होता. मात्र अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दराडेंचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.