Nashik Saptashrungi Temple Dress Code : नाशिकजवळ सुप्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल, तर आता नवीन नियम असणार आहे. सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर व्यवस्थापन, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. तेव्हा गडावर येणाऱ्या भाविकांना आता पूर्ण पेहरावाची सक्ती केली जाणार आहे. नाशिकमध्येच वाईन पर्यटनही होते. तेव्हा तिथले पर्यटक तोकड्या कपड्यांमध्येच देवीच्या दर्शनालाही येतात. त्यांना आवर घालण्यासाठी ड्रेसकोडची सक्ती केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकजवळ वणीला येथील डोंगरावर असलेलं हे देवीचे स्थान राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धं पीठ मानले जाते. या देवीच्या दर्शनाला राज्यभरातूनच नाही तर देशभरातून भक्त येत असतात.  देवस्थान ट्रस्टने देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी याआधी काही नियम घातले आहेत. त्यानुसार देवीच्या गाभाऱ्यात दर्शनाला जाताना स्त्री-पुरुषांना विशिष्ट पेहराव करणे बंधनकारक आहे. सरसकट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.


आरती आणि पूजेच्या कालावधीत भाविक आले तरच नोंदणी केलेल्या भाविकांनाच केवळ गाभाऱ्यात दर्शन घेता येणार. देवस्थानचं पवित्र राखण्यासाठी निर्णय घेतल्याचे देवस्थान ट्रस्टचे म्हणण आहे.  पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार आहे. तसेच  दक्षिणेकडच्या देवस्थानांमध्ये स्त्री-पुरुषांनी कोणता पेहराव करून मंदिरात दर्शनाला जायचं याचे काही कडक नियम आहेत. त्याप्रमाणे आता सप्तशृंगी मंदिरातही आता ड्रेसकोड लागू होणार आहे. पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार आहे.


तुळजाभवानी मंदिरबाबतचा 'तो' निर्णय काही तासात मागे


 राज्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी ड्रेक कोड लागू करण्यात आला होता. तुळजाभवानी मंदिर परिसरात तोकडे कपडे घालण्यास बंदी करण्यात आली  होती. तसा फलक मंदिराबाहेर लावण्यात आला होता.  भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरुन देण्यात आला होता. मात्र, जोरदार टीका झाल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला.  


मंदिर संस्थानाच्यावतीने एक नियमावली जाहीर केली गेली होती. अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले होते. मात्र यावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये स्पष्टीकरण देत असा कुठलाही ड्रेसकोड मंदिरात येण्यासाठी नसल्याचं मंदिर समितीने सांगत युटर्न घेतला.