सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्तीचौक उंटवाडी रोड येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला आपल्या लहान मुलीचा हट्ट पुरवणं महागात पडलं आहे. आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चिमुरडीचा आईस्क्रीमच्या फ्रीझरचा शॉक लागून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये मध्ये कैद झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीचे वडील या चार वर्षाच्या मुलीसह मातोश्री चौकात राहतात. मुलीला आईस्क्रीम खायची इच्छा झाल्याने म्हणून घराजवळ असलेल्या मेडिकल दुकानात सायंकाळी 9 च्या सुमारास ती वडिलांसोबत गेली. 


मुलीला आवडता आईस्क्रीमचा फ्लेवर हवा असल्याने ती फ्रिजरवर चढली. त्यानंतर तिला त्या फ्रिजरचा  शॉक लागलयाने ती खाली बेशुद्ध अवस्थेत पडली होती. यामुळे घाबरलेल्या वडिलांनी तिला  उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले मात्र वेळ निघून गेली होती. 


मात्र उपचारांआधीच त्या मुलीचा मृत्यू झाला होता.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.


दरम्यान,यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात देखील हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर लहान मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचं आहे.