COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात आवळी दुमला गावात तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय मुलीची हत्या झाल्याचं उघड झालंय. किरण उर्फ सोनी जमधडे ही अवघ्या पाच वर्षांची चिमुरडी  आपल्या चुलत आजोबाच्या वासनेला बळी पडली. 22 वर्षांचा असलेला पण मुलीचा नात्याने चुलत आजोबा असलेल्या गोपी जमधडे याने तिच्यावर चॉकलेट देऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध केल्याने गोपीने मुलीची दगडाने ठेचून हत्या केली.


घोटी पोलिसांनी एवढ्या गंभीर घटनेची कसून चौकशी केली नाही. त्यामुळे १४ दिवस घटना उजेडात आली नाही. पोलीस अधीक्षकांकडे गेल्यावर कारवाईला वेग आला. संशयित आरोपीला फाशी द्यावी या मागणीसाठी पालकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय.


दरम्यान या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविली होती. मात्र घोटी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत गोपी जमधडेला अटक केलीय. त्याला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुलीच्या काही अवयवांचीही विक्री करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे या घटनेला केवळ खुनापुरतं न पाहता त्यापुढे जात पोलिसांनी तपास सुरू केलाय.