Leopard Video : सहसा प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण, प्रत्येक वेळी हे प्राणी आकर्षणाचा विषय ठरतील असं नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये एक बिबट्या चक्क झरझर झाडावर चढताना दिसत आहे. देशात इथे नव्यानं आलेल्या चित्त्यांची चर्चा सुरु असतानाच समोर आलेला हा Video थरकाप उडवत आहे, असं म्हणायला हरकत नाही. (Nashik leopard spotted on nilgiri tree video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सांगवी शिवारात नारळाच्या झाडावर झुंजणाऱ्या बिबट्यांचा थरार मोबाईल व्हिडिओच्या माध्यमातून कैद करण्यात आला, ज्यानंतर आता थेट निलगिरीच्या झाडावर चढउतार करत असल्याचा त्यातील एक बिबट्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरलीये. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय. 



बऱ्याचदा वन्य प्राणी मानवी अधिवासात येतात त्यावेळी त्यांचा वावर इतरांना भीतीच्या वातावरणात ढकलतो. या बिबट्याच्या येण्यानंही सध्या अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तुम्ही व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिला?