डासांच्या बंदोबस्तासाठी नाशिक महानगरपालिकेचा `हटके` बंदोबस्त
पावसाळ्यात प्रत्येक वर्षी सर्वत्र आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो.
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : पावसाळ्यात प्रत्येक वर्षी सर्वत्र आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं डासांचा बंदोबस्त व्हावा यासाठी शहरातील २९० तळमजले बुजवण्याचा निर्णय घेतलाय.
नाशिकमध्ये डेंग्यूबरोबर चिकनगुनियानं थैमान घातलंय. तसंच साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढतेय. त्यामुळे महानगरपालिकेनं सर्व्हे करत डासांचा नायनाट करायचं काम सुरू केलंय. मात्र, यामध्ये धूरफवारणी, धुरवडी आणि इतर उपाययोजना करण्याऐवजी मनपानं बेसमेंट बुजवण्याचा निर्णय घेतलाय.
बेसमेंटमध्ये पाणी साचल्यानं डासांची उत्पत्ती होण्यास मदत होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मनपानं जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत तज्ज्ञांकडून केलं जातंय. तर नागरिकांनी थेट बेसमेंट न हटवता मनपानं योग्य तो पर्याय काढावा अशी मागणी केलीय. 'हे' केमिकल फ्री उपाय डासांना ठेवतील घरापासून दूर !