योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिक महापालिकेतील उप मुख्य लेखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सुरेखा घोलप असं निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. वित्तिय अनियमितता आढळल्यावरून, पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.तुकाराम मुंढे हे आपल्या कर्तव्यदक्ष कारभारामुळे ओळखले जातात. अनेकवेळा तुकाराम मुंढे हे राजकारण्यांचं म्हणणं ऐकत नसल्याने, त्यांना बदलीला सामोरं जावं लागतं असं देखील म्हटलं जातं. एकंदरीत नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी सुरूवातीपासून आपल्या कामावर छाप सोडली आहे. 


आधीचा सत्ताधारी भाजपला दणका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधी नाशिक महापालिकेत महासभेवेळी सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबतीत जयजयकाराच्या घोषणा देत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला चांगलंच कोंडीत पकडले होते. दरम्यान, मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांचे बजेट रद्द करुन नवीन बजेट सादर केले.अंदाजपत्रक म्हटलं की, पुढील वर्षभरात भ्रष्टाचार करण्याची तरतूद सुनियोजितपणे केली जाते. मुंढे यांनी नाशिक शहराला विकासाची दिशा देण्यासाठी सर्व भ्रष्ट योजनांना कात्री लावत नवीन बजेट सादर केले. स्थायी सभापती समिती निवृत्त झाल्यानं त्यांनी थेट नियमानुसार स्थायी समितीवर बजेट पाठवलं. सत्ताधा-यांच्या अधिकाराला ते बोचल्यानं त्यांनी मुंडेंना आपली बाजू मांडू दिली नाही. आणि थेट पुन्हा स्थायीत चर्चेसाठी पाठवले. 


मात्र, यावेळी सर्व विरोधकांची या विषयावर एकजूट झाल्याने सत्ताधा-यांची चांगलीच कोंडी झाली. महासभेत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात रोषाची बीजं रोवली गेली. आता पुढे हा रोष अधिक वाढणार असल्यानं सत्ताधा-यांचं बजेट मांडलं जाणार अशी चर्चा रंगू लागलीय. मात्र, मुंडे यांनी कोणालाही न डगमगता कडक धोरण अवलंबिण्याचे धोरण सुरुच ठेवलेय.


तुकाराम मुंढे यांच्याशी संबंधित महत्वाच्या बातम्या


तुकाराम मुंढे फक्त एकाच माणसाला घाबरतात


तुकाराम मुंढे यांची ही कारवाई सर्वात जास्त गाजली



आणखी दणका! मुंढेंकडून ३ कामचुकार अधिकाऱ्यांना नोटीस


तुकाराम मुंढेंची पाच मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई


नगरसेविकांच्या पतींची लुडबुड चालणार नाही- तुकाराम मुंढे


पुणे । तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी


शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली