तुकाराम मुंढेंची पाच मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई

कामात कुचराई करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केलंय.

Updated: Mar 13, 2018, 12:44 PM IST
तुकाराम मुंढेंची पाच मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई  title=

नाशिक : कामात कुचराई करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केलंय.

घरपट्टी वसुली कामकाजात कर्तव्यात कसूर केल्याने नाशिक रोड विभागीय कार्यालयातला एक वरिष्ठ लिपिक, सातपूर विभागीय कार्यालयातला एका कनिष्ठ लिपिकासह आरोग्य विभागातल्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.

तसंच आरोग्य विभागातल्या तीन सफाई कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंढे यांनी दिलेत.