नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे बेपत्ता असलेले सहाय्यक अभियंता रवी पाटील हे अखेर घरी परतले आहेत. रवी पाटील हे कामाच्या दबावामुळे चिठ्ठी लिहून गायब झाले होते. आता रवी पाटील नाट्यमयरित्या घरी परतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिकामाला कंटाळून रविंद्र पाटील आठवड्याभरापासून बेपत्ता झाले होते. आता रवी पाटील घरी परतल्याने ते नेमके कुठे गेले होते आणि का गेले होते? यावरचा पडदा उठणार आहे.


सहाव्या दिवशी रवी पाटील घरी परतल्याने घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. तर, मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेच्या श्वास घेतला आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


ग्रीन फिल्ड लॉन्स कारवाई प्रकरणाची फाईल हाताळणारे नाशिक महापालिकेचे उप अभियंता रवी पाटील हे अचानक गायब झाले. वॉक विथ कमिशनर कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून रवी पाटील सकाळी घराबाहेर  पडले. तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. आपल्या कारमध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. 'कार्यालयीन काम करताना येत असल्यामुळं दबावामुळं आपण आत्महत्या करतोय', असं चिठ्ठीत लिहिलं होतं. तसेच पाटील यांचा मोबाइल फोन देखील मोटारीतच आढळून आला होता.