सागर गायकवाड, झी मीडिया: सध्या आजूबाजूला अनेक घटना या घडत असतात. खासकरून लहान मुलांच्या (Childrens) बाबतीत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये (Bathroom) अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी (Hot Water) अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा (Girl) मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत बलिकेचे नाव आहे. आवेराच्याच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा मंगळवारी उपचारादरम्यान Death During Treatment) मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशाप्रकारे अनेक धक्कादायक गोष्टी घडताना दिसत आहेत. अशावेळी आपल्या लहान मुलांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांचे आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तान्ह्या बाळांकडे (Newborn Baby) आवर्जून लक्ष द्या. अशाप्रकारे जर तुम्ही तुमच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेतलीत तर तुम्हाला अशा तऱ्हेच्या अनेक वाईट घटनांपासून तुम्ही वाचू शकता. लहान मुलांच्या शेजारी शक्यतो कुठलीच गरम वस्तू ठेवू नका. त्यासोबत कुठल्याच प्रकारे इलेक्ट्रिक (Electrical) वस्तूही ठेवू नका. आपल्या लहान मुलांच्या आरोग्याची (Health) काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


हिटरला हात लावल्यानंही मुलाचा मृत्यू : 


काही दिवसांपुर्वीही असाच एक व्हिडीओ (Videos) व्हायरल झाला होता ज्यात घरात एक बाई आणि तिचा मुलगा राहत होते. हा लहान मुलगा (Child age) सात - आठ वर्षांचा होता त्याच्याही बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला होता. त्याची आई घरात स्वयंपाकघरात काम करत होती आणि तेवढ्यात हा मुलगा हॉलमध्ये खेळत होता त्यामुळे त्याच्या आईनं हॉलमध्ये लावलेला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला हिटर (Heater) या मुलाला खेळता खेळता लागतो. आई जेव्हा कळत तेव्हा फार उशीर झालेला असतो आणि तो मुलगा बेशुद्ध होतो. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


भाईगिरी पडली महागात : 


तुझ्या घरात नाही गहू, म्हणे एलसीडी घेऊ, तुझी जागीरदारी, हा तुझी भाईगिरी, इकडे आला तर खाशील मार, अप्परची पोर गुन्हेगार अशा प्रकारचं गाणं तयार करून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर (Viral) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक महबूब शेख (रा. काकडे वस्ती, गल्ली नंबर एक, अप्पर इंदिरानगर पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अप्पर मध्ये रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रकार वाढत आहेत मुलींना पाहून शिफ्टही मारल्या जात आहेत या त्रासाला अप्पर मधील महिला वैतागले असून बिबेवाडी पोलिसात वेळोवेळी तक्रारही दाखल करण्यात आल्यात मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.