नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती (Oxigen Leakage) घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. रात्री उशिरा आणखी पाच जण दगावले. यानंतर मृतांचा आकडा हा  29  पोहोचला आहे. तांत्रिक दोषांमुळे ऑक्सिजन गळतीची ही घटना घडली होती. यावेळी 22 रुग्णाचे तडफडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत्यूची संख्या 24 झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ऑक्सिजन गळतीप्रकरणी (Oxigen Leakage) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.


राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे.


नाशिक  महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेची पाहणी करुन माहिती घेतली असता तांत्रिक दोषांमुळे ही घटना घडल्याचे पुढे आले आहे आहे. सिलिंडर टँकमधून लिक्विड ऑस्किजनची गळती होऊ लागल्याने ही घटना घडली होती. या गळतीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न केले आहे. पंरतु या दरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरेसा पुरवठा होऊ न शकल्यामुळे यामध्ये 22 रुग्णांचा मृत्य झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी असून या दृर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाखाची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच नाशिक पालिकेकडूनही पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.