नाशिक : पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं नाशिकमध्ये शालिमार चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून रस्त्यावर चूल पेटवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरात पेट्रोल 80 रुपये लिटर या दरानं मिळत असल्यानं सरकारनं तात्काळ दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.


अंबरनाथमध्येही आंदोलन
दिवसागणिक वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढणा-या किंमती आणि भारनियमन यांच्या निषेधार्थ अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 


मोर्च्यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.