नाशिक : राज्यात गाजलेला नाशिकमधील मोठा रेशन घोटाळा अवघ्या दोन वर्षात पचवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रेशन घोटाळ्यातील सर्व आरोपी मोकाट हिंडत आहेत. विशेष म्हणजे या घोटाळ्यात आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. मात्र घोटाळ्यातील मुख्य आरोपी दोन वर्षातच मोकाट सुटलेत.


 सर्वोच्च न्यायालयाने नऊ महिन्यांपूर्वी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळूनही पोलिसांच्या आशीर्वादाने नाशिक जिल्ह्यात प्रतिष्ठेने फिरत आहेत. अन्नधान्य महामंडळातून निघणारे रेशनचे धान्य सरकारी गोदामाऐवजी थेट पिठाच्या गिरणीत जात होते. यात सव्वासात कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याची बाब गोदाम तपासणीत उघडकीस आली होती. मात्र आजही सर्व आरोपी मोकाट असून अनेक तत्कालीन आरोपी अधिकारी पुन्हा सेवेत रुजू झल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.