नाशिक : नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. त्यामुळे जर रविवारपर्यंत पाऊस नाही झाला तर नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय महापालिकेकडून घेतला जावू शकतो. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर यांना पत्रकार परिषदेत आज याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या महापौरांनी म्हटलं की, 'सध्या 1900 पाणीसाठा गंगापूर धरणात शिल्लक आहे. इतर राखीव पाणी वगळता 600 पाणीसाठा शहरासाठी गंगापूर धरणात शिल्लक आहे. त्यामुळे 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.' अशी माहिती महापौरांनी दिली.


'सोमवारी आढावा बैठक घेतल्यानंतर पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल. पण रविवारपर्यंत पाऊस न आल्यास पाणीकपात करावी लागणार,' अशी माहिती महापौरांनी दिली. 


'मुकणे धरणात 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आठवडयात एक दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. आठवड्याच्या बुधवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.' असं ही महापौरांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.