योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पर्यटनाच्या नावाखाली नाशिकमध्ये लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक ही पर्यटनाची नगरी म्हणूनही ओळखली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे परिसरातील त्रंबकेश्वर, शिर्डी, सप्तशृंग गड आणि भंडारदरा यासारख्या धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात याचाच फायदा घेत नाशिकमध्ये एका दाम्पत्याने लाखो रुपयांना गंडा घातलाय.


नाशिकमध्ये सानप या दाम्पत्याने गंगापूर रोड परिसरात व्हिनस टूर्स या नावाने एजन्सी खुली करून अनेकांना टूर्ससाठी पाठविण्याचे व्यवस्था करून दिली जाईल असे सांगून पैसे घेतले मात्र काही दिवस उलटल्यानंतर यात्रा रद्द झाली असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली.


पोलिसांत तक्रार 


मात्र पर्यटनासाठी जाणाऱ्या इच्छूकांनी पैसे घेण्यासाठी त्याच्या कार्यालयात जाऊन तगादा लावू लागले तरी देखील या दाम्पत्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे या पर्यटनासाठी जाणाऱ्या इच्छूकांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली.


दरम्यान या संपूर्ण प्रकरणात व्हिनस टूर्सचे संचालक विष्णू सानप आणि लता सानप यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.


सावध राहण्याची गरज 



शनिवारी व्हिनस टूर्सच्या संचालकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते .


सुनावणीत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र संचालकांवर कठोर कारवाई करून पैसे मिळावे अशी मागणी या तक्रारदारांकडून केली जातेय.


परंतु अशा फसव्या टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी पासून पर्यटकांनी सावध राहण्याची गरज आहे.