नाशिकमध्ये १४ वर्षाच्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या
शहरातील सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने, रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. सचिन १४ वर्षांचा होता, त्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे.
नाशिक : शहरातील सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने, रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. सचिन १४ वर्षांचा होता, त्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे.
सचिन पाळदेने शिकवणीसाठी जातो, असं सांगून सचिन रविवारी सकाळी घर सोडलं. सचिन देवळाली कॅम्प परिसरात महालक्ष्मी मंदिराजवळ राहत होता. सचिनने लालपूल परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेससमोर आत्महत्या केली.
रेल्वे पोलिसांना याबाबत दुपारी काही स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माहिती दिली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी असून तो नववीत शिकत होता. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.