योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : चंदीगढ विद्यापीठाच्या वसतिगृहातील मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ (Chandigarh University MMS Case) बनवल्याच्या आरोपानंतर पंजाबमधील मोहाली (Mohali) इथं असलेल्या चंडीगढ विद्यापीठात चांगलाच गोंधळ उडाला होता. गर्ल्स हॉस्टेलमधीलच (Girls Hostel) एका मुलीवर इतर मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप असून या मुलीने अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि मित्राला शेअर केल्याचा देखील आरोप आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, नाशिकमधल्या (Nashik) देवळाली कॅम्प (Devlali Camp) इथल्या लामरोड भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  लामरोड भागातील एका सोसायटीत आरोपी नंदलाल डांगी नावाचा व्यक्ती सुरक्षारक्षकाचं (Security Guard) काम करायचा. आपल्या कुटुंबासह नंदलाल गेल्या दहा वर्षांपासून याच सोसायटीत रहात होता. नंदलाल दिवसा सोसायटीत सुरक्षारक्षकाचं काम करत होता. अनेक वर्षांपासून तो या सोसायटीत असल्याने सोसायटीतल्या लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसला होता.


वास्तविक नंदलाल सोसायटीत भलतेत उद्योग करत होता. रात्र झाल्यावर नंदलाल त्याच्या जवळच्या मोबाईलमधून तिथल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवत असे. अंधाराचा फायदा घेत इमारतीच्या गच्चीवरुन तो हे व्हिडिओ बनवत होता. ही धक्कादायक देवळाली कॅम्प पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. 


नंदलालला पोलिसांनी अटक केल्याचं कळताच सोसायटीतील सोसायटीतील रहिवासी त्याला सोडवण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचले. पण पोलिसांनी रहिवाशांना त्याच्या काळ्या कृत्यांची माहिती दिली. यानंतर एका महिलेच्या तक्रारीवरुन नंदलालविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला पोलिसांनी अटक केली.