नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी माजी अध्यक्षासह 17 संचालकांवर बँकेचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी दोषारोप ठेवलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहकार विभागाकडून  सुरू असणाऱ्या चौकशीत कलम 88 च्या अंतर्गत दोषारोप पत्र ठेवण्यात आलीत. सर्व संचालकांना 22 जानेवारी 2018 ला बाजू मंडण्याची संधी देण्यात आलीय. 


नोकर भरती, सीसीटीव्ही खरेदीसाठी निविदा रकमेपेक्षा अधिक केलेला खर्च, राज्य सरकारने बरखास्त संदर्भात काढलेल्या अध्यादेशात विरोधात न्यायालयीन प्रक्रियेसाठी केलेला अतिरिक्त खर्च आशा सर्व बाबी लक्षात घेत संचालक मंडळाला दोषी ठरविण्यात आले असून खासदार हरिषचंद्र चव्हाण आणि आमदार अपूर्व हिरे याना दोषमुक्त करण्यात आलेत, तर इतर तिघा आमदारांवर आर्थिक नुकसान पोटीठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या कडून वसुली केली जाणार आहे.