मुंबई : शाळांप्रमाणेच कॉलेज सुरू होण्यापूर्वीही राष्ट्रगीत म्हणणं राज्यात अनिवार्य करण्यता आलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून राज्यात सुरू होत आहे. मात्र मुंबईतल्या कॉलेजांमध्ये या निर्णयाच्या अंमलबजबावणीबाबत व्यवस्थापन अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार तसंच विद्यापीठाकडून याबाबत कुठल्याच सूचना किंवा सर्क्युलर आलं नसल्याचं अनेक कॉलेजांकडून सांगण्यात आलं आहे. तर कॉलेजमधल्या प्रत्येक कार्यक्रमावेळी राष्ट्रगीत म्हटलं जात असल्याची माहिती काही प्राचार्यांनी दिली.



रत्नागिरीत सुरुवात 


उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्वच महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्हयातील सर्वच महाविद्यालयात आजपासून राष्ट्रगीत म्हणण्यात आलं. राज्यातील सर्वच महाविद्यालयात राष्ट्रगीत सुरु करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले होते त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांनी केली आहे


राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये आजपासून राष्ट्रगीत होणार आहे.