नवी मुंबई : जनतेच्या जनादेशचा अवमान करून शिवसेना (Shiv Sena)  ही काँग्रेस आघाडी (Maha Vikas Aaghadi)  बरोबर गेली आणि सत्ता स्थापन केली, हे बदलेलं राजकीय धोरण लक्षात घेऊन प्रखर भाजप (BJP) विरोधी पक्ष म्हणून कसं काम करता येईल, याची चर्चा आजच्या कार्यकारणीमध्ये झाली आहे. उद्या या संदर्भात ठराव केला जाईल. प्रखर आंदोलन हे सत्ताधारी विरोधात यापुढच्या काळात उभे केले, जाईल त्यावर चर्चा आजच्या कार्यकारणीमध्ये झाली, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पत्रकार परिषदेत दिली. मावळत्या कार्यकारणीची परिषद सुरू आहे. उद्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यावर नवी कार्यकरणी पुढच्या काळात स्थापन केली जाईल, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ही निवडणूक स्वातंत्रपणे लढवणार आहे. महाविकास आघाडी विरोधात निवडणूक लढवणार आहोत. तर मनसेबरोबर युती करणार नाही, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राज्यसभा निवडणुकीबाबत पक्षाची नवीन संसदीय समिती ही निर्णय घेईल आणि नावे निश्चित करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार. त्यानंतर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, तावडे म्हणालेत.


समृद्धी महामार्ग संदर्भात शिवसेनेची आधी भूमिका वेगळी होती आणि मग बदलली. 'भूमिका एक आणि कृतीत दुसरेच' असं आजच्या सामना मधील नाणारच्या जाहिरातीतून स्पष्ट होते आहे, अशी टीका तावडे यांनी शिवसेनेवर केली.