मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे ईडी कारवाईवर बोलताना नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला आहे. ज्यांनी गैरव्यवहार केला तो बाहेर येतोच. तसंच ही कारवाई योग्यच असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे. (Navneet Rana's demand for President's rule in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राष्ट्रपती शासन राज्यात लागलं पाहिजे. 2 मंत्री जेलमध्ये आहेत. एकाने राजीनामा दिला आहे. एकाने नाही दिला. ज्या राज्यात अशी राजवट चालू आहे तिथे राष्ट्रपती शासन (President's rule) लागू होणं गरजेचं आहे.' असं देखील राणा म्हणाल्या.


सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, 'सरकार पाडण्याचा संबंध येतो कुठे? मी देवेंद्रजी यांचे आभार मानते की, त्यांनी एक गोष्ट कबूल केली आहे की, 2024 नंतर त्यांचं सरकार येईल. असं ते स्वत: म्हणताय.'


बातमीचा व्हिडिओ