Navratri Colours 2022 : शारदीय नवरात्र (Shardhiy Navaratri) हा एक हिंदू धर्मातील सण आहे. हा सण  वर्षांतून दोनदा अर्थात चैत्र (मार्च-एप्रिल) आणि शारदा (ऑक्टोबर-नोव्हेंबर) या महिन्यात साजरा केला जातो. गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्र सुरु होते. भारतात या सणाला अतिशय महत्व आहे. 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Shardhiy Navaratri) सुरुवात होईल. या 9 दिवसांमध्ये देवीशी संबंधित पूजा, आराधना आणि व्रत केले जातात. त्या 9 रगांचे या नऊ दिवसांमध्ये विशेष महत्त्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवीची रुपे-
1. शैलपुत्री, 2. ब्रह्मचारिणी 3. चन्द्रघंटा 4. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) 5. स्कंदमाता 6. कात्यायनी 7. कालरात्री 8. महागौरी 9. सिद्धिदात्री 
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत. देवीच्या 9 रुपांप्रमाणे त्या 9 दिवसांमध्ये तिच्या प्रिय रंगाचे वस्त्र तिला नेसवले जाते. शारदीय नवरात्रौत्सवात या 9 रगांचे विशेष महत्त्व आहे. 


यदांच्या शारदीय नवरात्रोत्सवात 9 रंग  (9 colours) आणि त्यांचे विशेष महत्त्व जाणून घेऊ...


1. नवरात्र प्रतिपदा तिथी , पांढरा रंग (White)
पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. शारदीय नवरात्र सणाच्या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला हा रंग आवडतो. पांढरा रंग हा श्वेत, शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंगामुले आत्मविश्वावसही वाढतो.


2. नवरात्र द्वितीया तिथी, लाल रंग (Red)
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल. लाल रंग हा साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.  शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी लाल रंग शुभ मानला जातो. 


3. नवरात्र तृतीया तिथी , नारंगी रंग (Orange)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर 2022 रोजी बुधवारी चन्द्रघंटा देवीची पूजा केली जाईल. या दिवशी नारंगी वस्त्राला महत्त्व आहे. चन्द्रघंटा देवीचा नारंगी रंग आवडतो. नांरगी रंगाला सकारात्मक उर्जेचे प्रतिक मानला जाते.
शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी नांरगी रंग शुभ मानला जातो.


4. नवरात्र चतुर्थी तिथी , पिवळा रंग (Yellow)
चौथ्या दिवशी म्हणजेच 29 सप्टेंबर 2022 रोजी गुरुवारी कुष्मांडी देवीची पूजा केली जाईल. कुष्मांडी देवीला पिवळा रंग आवडतो. शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळ्या रंगाला सौभाग्याचे, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. 


5. नवरात्र पंचमी तिथी ,हिरवा रंग (Green)
पाचव्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारी स्कंदमातेची पूजा केली जाईल. शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. स्कंदमातेला हिरवा रंग आवडतो. हिरवा रंग निसर्गाचे प्रतिक आहे. हिरवा रंग धारण केल्याने चैतन्यामध्ये वाढ होते. 


आणखी वाचा... Rain In Maharashtra : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस


6. नवरात्र षष्ठी तिथी , राखाडी रंग  (Grey)
सहाव्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 रोजी शनिवारी कात्यायनी देवीची पूजा केली जाईल. कात्यायनी देवीला राखाडी रंग आवडतो. शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी राखाडी रंग शुभ मानला जातो. या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र वापरले जाते. राखाडी रंगाला बुद्धिमत्तेचे प्रतिक मानले जाते. 


7. नवरात्र सप्तमी तिथी , निळा रंग (Blue)
सातव्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी रविवारी म्हणजेच सप्तमीला कालरात्री देवीची पूजा केली जाईल.  शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळ्या रंगाला विश्वासाचे प्रतिक मानले जाते. आकाश आणि पाण्याचा निळा रंगामुळे डोळ्यांना शांतता मिळते.


8. नवरात्र अष्टमी तिथी , जांभळा रंग (Purple/Violet)
आठव्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2022 रोजी सोमवारी म्हणजेच अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाईल.  शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी जांभळा रंग शुभ मानला जातो. महागौरी देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचे प्रतिक मानले जाते. 


9. नवरात्र नवमी तिथी , गुलाबी रंग (Pink)
नवव्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारी म्हणजेच नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल.  शारदीय नवरात्र सणाच्या या दिवशी गुलाबी रंग शुभ मानला जातो. सिद्धिदात्री देवीला गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि स्त्री शक्तीचे प्रतिक आहे.


आणखी वाचा... 10वी पास उमेदवारांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी, लवकर करा 'इथे' अर्ज