Karnataka Brings In Job Quota In Police : अनेक तरुणांना पोलिसांची नोकरी असावी असे वाटते. यासाठी इच्छुक तरुणांची दहावीत येईपर्यंत वेगवेगळ्या पातळीवर त्यांची तयार सुरू असते. त्यामुळे अशा तरुणांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
कर्नाटक राज्य पोलिसांनी (Karnataka State Police) सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल (CAR/DAR) पदाच्या भरतीसाठी बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पुरुष आणि पुरुष ट्रान्सजेंडर या नोकऱ्या मिळविण्यासाठी पात्र आहेत. KSP वर्ष 2022 साठी एकूण 3484 पदे भरत आहे.
कर्नाटक पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्वांनी 19 सप्टेंबर 2022 पासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन मोडद्वारे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. ksp-recruitment.in अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे. तथापि, उमेदवार 03 नोव्हेंबर 2022 पर्यंत फी जमा करू शकतात.
KSP भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार पात्रता, निवड, अर्ज प्रक्रियेशी संबंधित अधिक तपशील खाली दिलेल्या PDF लिंकवर पाहू शकतात.
Karnataka Police Notification Download 1
Karnataka Police Notification Download 2
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSLC/10वी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर SC, ST, OBC (2A, 2B, 3A, 3B) प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील आदिवासींमधून येणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. या पदांवर उमेदवारांना 23500 रुपये ते 47650 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
वाचा : तुम्ही जर Twitter वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! 21 सप्टेंबरपासून होणार...
KSP भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम https://ksp.karnataka.gov.in/ किंवा https://ksp-recruitment.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला अर्जाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
आता तुमचा तपशील विचारला जाईल. तपशील भरा आणि सबमिट करा.
सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढा.
सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल सामान्य पुरुष (सीएआर, डीएआर) 2,996 जागा आहेत. तर तृतीयपंथीयांसाठी (सीएआर, डीएआर) 68 जागा राखीव आहेत. एकूण 3064 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.