कोल्हापूर  : नवरात्रोत्सव आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. नवरात्रौत्सवामध्ये कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान देशभरातील लाखो भक्त दररोज आवर्जून अंबाबाई देवीच्या दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समीतीतर्फे मंदिराच्या कळसाचं रंगरंगोटीचं काम केल जातं. 


पहिल्या टप्प्यात मंदिराची रंगरंगोटी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात मंदिर स्वच्छ धुऊन घेतलं जात. तर तिसऱ्या टप्प्यात मंदिराला दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाते.