मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांना काल ईडीने अटक केले. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार, नेते यांनी आंदोलन केले. मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर याही आंदोलनात सामील झाल्या आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना निलोफर यांनी ईडीवर टीका केलीय. मागील काही दिवस आम्हाला त्रास होणार अशी खूप चर्चा होत होती. एनसीबीकडून त्रास दिला गेला. पण आम्ही सत्य बाजू मांडत होतो.


आम्ही जमीन खरेदी केली. परंतु, ज्या पद्धतीने चित्र निर्माण केले त्यातून आम्ही काही चूक केली असे दाखवण्यात आले. लवकरच ही कागदपत्र आम्ही दाखवू. माझ्या वडिलांना घरातून घेऊन जाण्यापूर्वी कोणतीही चर्चा नाही, कल्पना दिली नाही. ईडी अधिकारी थेट त्यांना घरातून घेऊन गेले. केंद्रीय यंत्रणांना एक्स्पोझ करण्याचं काम माझे वडील करत होते. त्यामुळे त्यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केलीय असा आरोप त्यांनी केला.


माझे वडील यांना रिमांड घेताना महसूल मंत्री म्हटले आहे. केंद्रीय यंत्रणा चुकीची खोटी माहिती देत आहेत. भाजपाकडून मुद्दाम त्रास दिला जात आहे. पण, त्यांची मुलगी म्हणून मी वडिलांना साथ देणार. सत्य समोर आणणार असेही निलोफर म्हणाल्या.


५५ लाख रूपये व्यवहाराला ईडी चौकशी? - आव्हाड
ईडीच्या रिमांड काॅपीत मलिक हे महसूल मंत्री असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक हे पाचवेळा मंत्री होते. गृहनिर्माण मंत्री, अल्पसंख्याक मंत्री होते. पण ते कधीच महसुल मंत्री नव्हते. या प्रकरणातील सलिम पटेल आहे त्याचा मृत्यू झालाय. पण, ईडीने जो कुणी सलीम शोधला आहे तो सलिम फ्रूटवाला आहे. ५५ लाख रुपयांच्या या व्यवहाराची चौकशी ईडी करते? असा सवालही त्यांनी केला.