गडचिरोली : नक्षलवाद्यांनी एकाच दिवशी दुसरी घटना घडवून आणली आहे. कुरखेडा तालुक्यात भुसुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्यांनी जवानांच्या खाजगी वाहनाला लक्ष्य केले. लेंदारी पुलाजवळ नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये एक डाईव्हर आणि १५ जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी जाळपोळ झालेल्या स्थळापासून जवळच ही घटना घडली आहे. स्फोटात अधिक जवान जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे. अधिक सुरक्षा दलांच्या तुकड्या येथे पाठवण्यात आल्या आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे. त्यामुळे नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा आहे.


मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीच्या डीजीपी आणि एसपींच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.




'ही दुर्दैवी घटना आहे. यावर लवकरच नवीन तंत्रज्ञान आणून नक्षलवाद्यांचा खात्मा केला जाईल. जंगलात कोठेही लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना शोधून काढलं जाईल १ मेच्या दिवशी पोलिसांची परेड असते. याचाच फायदा घेत त्यांनी हा स्फोट घडवून आणली. पण नक्षलवाद्यांना सोडणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. यावर कडक कारवाई करणार.' अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.