Latest Political News in Marathi : पुणे जिल्हा राष्ट्रवादीत ( Pune NCP ) मोठी खळबळ माजली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीचा पाढाच वाचून दाखवला. (Maharashtra Political News) कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या कमिट्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही, अशी तक्रार शरद पवार यांच्या समोर करण्यात आली. पक्षातील गटतट दूर झाले तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितलं. पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला दिलीप वळसे पाटलांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Politics ) 


राष्ट्रवादी पक्षामधील धुसफूस आली समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यासह आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी चक्का शरद पवार यांच्या समोर पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढा वाचला. त्यामुळे राष्ट्रवादीत नक्की काय चाललंय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे.


'पवार साहेब कात्रज दूध संघ, पीएमआरडीए या कमिट्यांवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. तसेच साहेब पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली एक हाती सत्ता येईल, असे कार्यत्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. या तक्रारी मांडताना बैठकीच्यावेळी अनेकांचे चेहरे पडलेले दिसून आले.


'नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न हवेत'



त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब तालुक्यामधून शहरात जात आहे. त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे. हे लक्षात घेऊन नवनवीन रोजगार कसे येतील यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासह असंख्य समस्या आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीचा पाढाच पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर वाचवून दाखविला. आता पवार काय निर्णय घेतात, याचीच उत्सुकता आहे.