Ajit Pawar on Narayan Rane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Ajit Pawar) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरु आहे. अजित पवार यांनी केलेली टीका जिव्हारी लागल्यानंतर नारायण राणे यांना त्यांना उत्तर दिलं होतं. नारायण राणे वांद्र्यात (Bandra By-Election) एका बाईमुळे हारल्याचं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर नारायण राणे यांनी माझ्या नादी लागू नका, पुण्यात (Pune) येऊन बारा वाजवेन असा जाहीर इशारा दिला होता. त्यानंतर आता अजित पवारांनी त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांना नारायण राणेंच्या आव्हानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी पुण्यात यावे, त्याचं स्वागत आहे असं विधान केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सहाशे अधिकारी बदल्या रखडल्या असून तीन हजार फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित असल्याचं सांगत सर्वसामान्य जनतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही अशी टीका केली. 


नारायण राणे यांना काय आव्हान दिलं होतं?


"अजित पवारांना बारामतीच्या बाहेरील राजकारण किती कळतं हे मला माहिती नाही. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी इच्छाच नाही. ते ज्याप्रकारचे राजकारणी आहेत, ते पाहत त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये. पण त्यांनी उगाच माझ्या नादाला लागू नये. अन्यथा मी पुण्यात येऊन त्यांचे बारा वाजवेन," असा इशारा नारायण राणे यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. 


बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरुन आपण कोकणातून निवडुणकीसाठी उभे राहिलो आणि सहा वेळा निवडून आलो. काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन आपण वांद्र्यातून निवडणूक लढलो होतो. समोरचा उमेदवार महिला असो किंवा पुरुष, तो उमेदवारच असतो असंही ते म्हणाले होते. 


अजित पवारांच्या कोणत्या विधानावर नारायण राणे संतापले होते?


अजित पवार यांनी शिवसेना सोडणाऱ्या नेत्यांना लक्ष्य करताना नाराणय राणे यांच्यावर टीका केली होती. "ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, त्या सर्व नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून दोनवेळा निवडणुकीत हारले. वांद्र्यात तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं," अशी टीका अजित पवारांनी केली होती.