Ajit Pawar Black and White: `मी स्वत:ला दादा....`; CM एकनाथ शिदेंच्या `त्या` विधानावर अजित पवारांनी दिलं उत्तर
Ajit Pawar Black and White: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्ही पुण्यातून (Pune) दादागिरी संपवणार असं विधान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आता ठाण्यात (Thane) काय चालतं हे आपल्याला माहिती आहे. आता तिथे एकनाथ शिंदेंची दादागिरी चालते असं म्हणायचं का? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे.
Ajit Pawar Black and White: ठाण्यात (Thane) काय चालतं हे सर्वांना माहिती आहे. मग ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) दादागिरी चालते असं म्हणायचं का? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. पुण्यात कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील सध्याची स्थिती, पार्थ पवारांचं राजकारणा, शिंदेंचं बंड यासह अनेक मुद्यांवर मोकळेपणाने उत्तरं दिली.
एकनाथ शिंदे यांनी आम्ही पुण्यातून दादागिरी संपवणार असं विधान केलं होतं. 'पुण्यात ज्यांनी अनेक वर्ष दादागिरी केली त्यांची दादागिरी मोडीत काढणार. 60 वर्षांत केलं नाही, ते आम्ही करून दाखवणार', असं एकनाथ शिंदे यांनी कसब्यातील रोड शोनंतर म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की "मी पुण्यात बरीच वर्षं पालकमंत्री म्हणून काम केलं. साताऱ्यातही मी काही काळ पालकमंत्री म्हणून होतो. पण 2004 ते 2014 आणि नंतर अडीच वर्षं मी पुण्यात पालकमंत्री म्हणून होतो. मला जितकी कामं करता येतील ती केली. माझ्या घऱात मोठा असल्याने मला दादा म्हणतात. पण मला कोणीही फोन केला तर मी अजित पवार किंवा अजित बोलतोय असं सांगतो. मी स्वत:ला दादा म्हणवून घेत नाही. कदाचित आपल्या लोकांना बरं वाटावं म्हणून एकनाथ शिंदेंनी तसं विधान केलं असेल".
ठाकरे सरकारने खरंच फडणवीसांच्या अटकेचा कट आखला होता का? अजित पवारांचा मोठा खुलासा
"काही लोक इथे अजित पवारांचं प्रस्थ असून अधिकारी त्यांचंच ऐकतात असं सांगत असतात. त्यांचा स्वभाव असा आहे, जरब आहे असं ते सांगत असतात. मग आपल्या लोकांना आपलंसं करण्यासाठी त्यांनी दादागिरी संपवून टाकू असं म्हटलं असावं," अशी शक्यता अजित पवारांनी बोलून दाखवली.
पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."
"आता ठाण्यात काय चालतं हे आपल्याला माहिती आहे. आता तिथे एकनाथ शिंदेंची दादागिरी चालते असं म्हणायचं का. आम्ही पुण्यात कधी दादागिरी केली नाही. पुणे दादागिरी स्विकारणारही नाही. शेवटी आपल्या नेत्याचं व्हिजन, विकासाचा दृष्टीकोन, कामाची पद्धत याकडे लोक पाहत असतात. त्यानुसार ते पाठीशी उभं राहतात. मी माझ्या पद्धतीने काम करत राहिलो. मला पुणेकरांनी, आमच्या जिल्ह्याने खूप साथ दिली. 25 वर्ष पिंपरी चिंचवड आमच्याकडे होतं. 10 वर्ष पुण्यात आमचा महापौर होतो. जिल्हा बँक, दूधसंघ आमच्या ताब्यात होतं. हे माझ्या एकट्याचं कर्तृत्व नाही. अनेक मोठे नेते यामागे असून सगळे मिळून काम करत असतो," असं अजित पवार म्हणाले.