Ajit Pawar Black and White: पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."

Ajit Pawar Black and White: 2019 लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार (Parth Pawar) राजकारणापासून दूर आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी पार्थ पवार यांचा मावळ मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान या पराभवानंतर राजकारणापासून दुरावलेलेल पार्थ पवार पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का? यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.   

Updated: Feb 28, 2023, 07:25 PM IST
Ajit Pawar Black and White: पार्थ पवार राजकारणात कधी सक्रीय होणार? अजित पवार म्हणाले "दुर्दैवाने आम्हाला..."  title=

Ajit Pawar Black and White: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचं एक वेगळं स्थान आहे. शरद पवारांनंतर (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राजकीय वारसा कायम ठेवला असून आता रोहित पवार (Rohit Pawar) ही जबाबदारी पार पाडत आहेत. दरम्यान रोहित पवार यांच्यासह आणखी पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने राजकारणात प्रवेश केला होता. ते म्हणजे पार्थ पवार (Parth Pawar). पण निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार राजकारणापासून दूर गेले. दरम्यान पार्थ पवार राजकारणात पुन्हा सक्रीय होणार की नाही यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अजित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. 

"राजकारणात बळजबरी आणू शकत नाही"

पार्थ पवार सक्रीय राजकारणात पुन्हा कधी येणार? असं विचारण्यात आलं असता अजित पवार म्हणाले की "शरद पवार साहेबांच्या कुटुंबात 12 भावंडं होती. तरीदेखील राजकारणात फक्त शरद पवारच आले. त्यांचे ज्येष्ठ बंधू वसंतदादा पवार आले पण ते जास्त काळ राजकारणात राहिले नाहीत. दुर्दैवाने त्याचं दु:खद निधन झालं. इतर भावंडांनी मात्र आपापलं क्षेत्र निवडलं. त्यानंतरच्या भावंडांमध्ये आम्ही सहाजण आहोत. त्यातील मुलांमध्ये फक्त मीच राजकारण क्षेत्र निवडलं. राजकारणात असं कोणाला आणू शकत नाही. तुम्हाला ती आवड असली पाहिजे. आपण कोणाला तिथं बळजबरीने आणू शकत नाही".  

ठाकरे सरकारने खरंच फडणवीसांच्या अटकेचा कट आखला होता का? अजित पवारांचा मोठा खुलासा

"मी स्वत:ला दादा...."; CM एकनाथ शिदेंच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी दिलं उत्तर

 

 

"रोहित पवारांना आधीपासून राजकारणाची आवड होती, त्यात त्यांना यश आलं. पार्थलाही संधी दिली गेली, पण दुर्दैवाने त्याला अपयथ आलं. आम्हाला सगळ्यांना अपयश आलं नव्हतं. ज्याला उत्सफूर्तपणे काम करायचं आहे तो करु शकतो. ज्याची त्याची आवड असते. कोणालाही राजकारणाचं प्रशिक्षण देऊ शकत नाही. लहानपणी आम्ही पवार साहेबांच्या घरी लोक आल्यानंतर चहा द्यायचो तेव्हा लोकांना न्याहाळायचो. पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही कोणालाही विरोध करत नाही. जे क्षेत्र आवडतं ते निवडावं," असं अजित पवारांनी सांगितलं. 

 
स्पष्टवक्ते असल्याने कधी अडचण होते का?

"मी 1991 मध्ये राजकारणात आलो. मला खासदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं. अनेकांनी मला तुमचा हा स्वभाव पुढे अडचणीचा ठरेल असं सांगितलं होतं. पण 1991 ते 2023 अशा 32 वर्षात मला ते कधी जाणवलं नाही," असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. 

2004 च्या संदर्भातील निर्णय दिल्लीत झाला होता. जर तो निर्णय वेगळा असता तर चित्र बदललेलं असतं. देशातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्र्यांनी जितके अधिकार आहेत तितके कोणाला नाहीत. उपमुख्यमंत्र्यांना तसे फार काही अधिकार नाहीत असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. 

तुमच्याबाबत वारंवार शंका निर्माण केल्या जात असल्याबद्दल विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सांगितलं की "2019 च्या सुरुवातीला मी देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेतल्याने तशी शंका निर्माण होत असेल किंवा काहीजण तशी वक्तव्यं करत असतील. पण 2019 च्या आधीचा काळ पाहिला तर कोणी अशी शंका उपस्थित करत नव्हतं. पण अशा शंका घेतल्याने मला फरक पडत नाही. आपली जबाबदारी मी चोख पार पाडत असतो".