Vikram Gokhale Passes Away: सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी संवेदनशील अभिनेता हरपला- शरद पवार
Vikram Gokhale Passes Away: सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Sharad pawar on Vikram Gokhale Death : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रूग्णालयात होते, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज शनिवारी त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. गोखले यांच्या निधनानंतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (ncp chief sharad pawar twitter on legendary actor Vikram Gokhale death at pune)
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत पवार यांनी ट्विट केलं आहे.
अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. 50 वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे विक्रम गोखले यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळ सहच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत.