Sharad Pawar Vs Ajit Pawar : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला. पक्ष कुणाचा हा वाद कोर्टात पोहचला यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने नविन चिन्हांचे पर्याय शोधले. अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी पक्षात पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे. चिन्ह गोठल्यास  शरद पवार आणि अजित पवार गटाला नविन पर्यायी चिन्हांचा शोध घ्यावा लागणार आहे. 


6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढं राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून नव्या चिन्हांची चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास नवं चिन्हं काय असावं, याबाबत अजित पवार गटाची कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचं समजतो. तर, दुसरीकडं शरद पवार गटही सुनावणीसाठी तयार आहे. येत्या 6 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगापुढं राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.


अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या 53 आमदारांवर दावा


निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरपासून राष्ट्रवादीवर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने त्यांच्याकडे विधानसभेतले 53 पैकी 43 तर विधानपरिषदेतले 9 पैकी 6 आमदार असल्याचा दावा केलाय. तर, दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदांना अपात्र करण्याची  मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. 


अजित पवार यांच्याकडून राजकीय भूकंप


1 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोटा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली आहे. यानंतर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांवर पक्षातर्फे अपात्रतेची कारवाई करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या 9 आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलीय.