Maharashtra Politics, मुंबई :  शिंदे गटाचे नेते राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रान पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. सत्तार यांनी अत्यंत गलिच्छ भाषेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक भडकले आहेत. संतप्त कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे गंभीर पडसाद उमटल्याचे पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने मुंबईत तणावाचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी


सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले. अद्बल सत्तार यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले. कार्यकर्त्यांनी तोडफोड देखील केली. यावेळी पोलिस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. या सगळ्या गोंधळानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनामाण्याची देखील मागणी होत आहे.  


अब्दुल सत्तार काय बोलले?


संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं खासदार एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होणार आहे. या सभेची सर्व तयारी अब्दुल सत्तार बघत आहेत. यावेळी अब्दुल सत्तार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला.  सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे.