ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे
ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आलेत. (Political News)
ED Raids Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. (ED raid at Kolhapur) ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. (ED Raid) सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झाले आहे. मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेत. (Political News)
हसन मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. पुन्हा एकदा आज हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही वाहतुकाला बंद करण्यात आला आहे.
याआधी ईडीकडून चौकशी
दरम्यान, मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. यावेळी ईडीकडून चौकशीही करण्यात आली. मुश्रीफ यांच्या घरावर आणि बँकेत छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी ईडीने पुणे आणि कोल्हापूर येथे छापे टाकले होते. 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने केली होती. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यावेळी काही कागदपत्र जप्त करण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे लेखापरीक्षण करण्यासाठी विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने काही साखर कारखाने आणि कंपनी यांना कर्ज दिले आहे. यात हसन मुश्रीफ संबंधीत कंपन्या आहेत. दोन्ही संस्थांच्या कर्जाच्याबाबतीत बँकेंचे अध्यक्ष आणि संचालक हसन मुश्रीफ यांचेशी असलेले सहसंबंध आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आले, असा आरोप करण्यात आला आहे. हा पैसा कोठून आला, याची चौकशी करण्यात येत आहे.
ईडीकडून आपल्याला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आले नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने म्हटले आहे.