रायगड : शिवसेना भाजपामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेते सामील होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे अवधूत तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. ही सदिच्छा भेट असून त्यात राजकीय चर्चा झाल्याचं अवधूत तटकरेंनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तर अवधूत तटकरेंची समजूत काढणार असून ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा विश्वास खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केलाय.



'मी कुठेही जाणार नाही'


खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


तसेच नाशिकमधील दिंडोरी मतदार संघातील राष्ट्रवादीचे धनराज महाले शिवसेनेत प्रवेश केला. 


या सर्व प्रकरणावर खासदार सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी झी २४ तासशी बोलताना स्पष्ट केले आहे.