बंदी झुगारून राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल
कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे.
बेळगाव : कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. पवारांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदीचे आदेश झुगारुन राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल झालेत.
कर्नाटक सरकारनं घातली बंदी
जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुपेकर पोलिसांना चकवा बेळगावमध्ये पोहचलेत. या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये, यासाठी कर्नाटक सरकारनं बंदी घातली होती.
बंदी झुगारत नेते बेळगावात दाखल
मात्र ही बंदी झुगारत राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल झालेत. वादग्रस्त सीमाभाग कर्नाटकाचाच आहे, असं भासविण्यासाठी कर्नाटक सरकार गेल्या काही वर्षापासुन बेळगावात विधीमंडळ अधिवेशन भरवित.
अधिवेशनाला आज बेळगावमध्ये सुरुवात
यंदाच्या या अधिवेशनाला आज बेळगावमध्ये सुरुवात होणार आहे. त्याविरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी जनतेचा महामेळावा आयोजित करते.