Jitendra Awhad: काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. कळवा येथे हा कार्यक्रम झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी गाडीत बसून जात होते. त्यावेळी आव्हाडांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कार्यक्रमात काहीसा गोंधळ उडाला होता. त्यावेळी आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप (Allegation of molestation) करण्यात आला. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या ट्विटनंतर (Jitendra Awad Tweet) मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (ncp jitendra awhad new allegations share womans video on twitter maharashtra politics marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आव्हाडांनी ट्विट करत धक्कादायक दावा केला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे आता आव्हाडांच्या अडचणी वाढणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आव्हाडांनी ट्विट करत असताना एक व्हिडिओ (Jitendra Awad Tweet Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ मंत्रालयाबाहेरील असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.


आणखी वाचा - ...तर मंत्रिपद काढून घेईन; पंतप्रधानांनी धरले नारायण राणेंचे कान


ट्विटमध्ये काय म्हटलंय ?


354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटात देखील आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओमधील त्या कोणाला भेटल्या? कशा भेटल्या? अशी चर्चा मंत्रालयात सुरु असल्याचं आव्हाडांनी ट्विटमध्ये (Jitendra Awad Tweet) म्हटलं आहे.


पाहा Video - 



दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 376 ची तयारी म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधीत कलम. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधील महिला नेमक्या कोण आहेत? आणि कोणता कट रचला जातोय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.