Rohit Pawar On wife: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तडफदार नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी ट्विटरद्वारे राज्यातील प्रमुख मुद्द्यावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं होतं. अशातच आता रोहित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. बेधडक आमदार रोहित पवार कोणत्या व्यक्तीला घाबरतात? यावर त्यांनी एका मुलाखतीत (Rohit Pawar Interview) भाष्य केलंय. लग्न झाल्यानंतर असं कधी लक्षात आलं? की बायको (Rohit Pawar Wife) नाहीतर काही नाही, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं.


काय म्हणाले रोहित पवार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं अनेकदा वाटतं आणि रोजरोज वाटतं आणि असाही प्रश्न पडतो की, माझ्यासारख्या व्यक्तीला..जो सात्त्याने बाहेर असतो आणि कामात असतो. तर माझी बायको मला कशी हॅडल करत असेल. कारण काय तर, एकतर ती हाऊसवाईफ आहे, तिच्या मर्जीने ती हाऊसवाईफ आहे. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि हाऊसवाईफ होणं सोपं नाही, असं रोहित पवार म्हणतात.


आणखी वाचा - Rohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...


सुट्टीच्या दिवशी एक तास जरी मुलांना हॅडल करायचा असेल, तर ती सोपी गोष्ट नाही. लाखो लोकांना हॅडल करू शकतो, पण मुलांना नाही. आणि माझी पत्नी रोज ते करते. मुलांकडे लक्ष द्या, हा टाईम पुन्हा येणार नाही. मुलांबरोबर चर्चा करा, त्यांच्याशी गप्पा मारा, असं पत्नीला अप्रत्यक्षपणे असं सांगायचं असतं, असंही रोहित पवार सांगतात.


पाहा Video 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Marathi Kida (@marathikida)


दरम्यान, ही बायकोची भीती आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार म्हणतात.