राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
नवी दिल्ली : NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण, ही भेट 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep ) या चित्रपटाच्या निमित्ताने असल्याचं कोल्हे यांनी म्हटले आहे. पण, शाहांची भेट घेतल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
डॉ. अमोल कोल्हे यांचा Shivpratap Garudjhep हा सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेला दे धक्का देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे प्रमोशन कोल्हे करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कोल्हे यांनी अमित शाह यांची भेट घेत, त्यांना या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी निमंत्रण देखील दिले.
अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चित्रपटाविषयी आणि महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी, सध्याच्या स्थितीविषयीही चर्चा झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर कोल्हे यांनी केले आहेत.
अमोल कोल्हे यांनी पोस्ट करताना म्हटलंय, अमित शाह यांची भेट घेऊन शिवप्रताप गरुडझेप सिनेमाची माहिती दिली आणि दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली. ज्या घटनेने 356 वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली त्या घटनेवर आधारित शिवप्रताप गरूडझेप या सिनेमाने देशाचे लक्ष वेधावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हाच उद्देश! तसेच यानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वे, शिवसंस्कार सृष्टी आणि इंद्रायणी मेडिसिटी संदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.