मुंबई : Maharashtra Assembly Opposition Leader : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे. शिवसेना गट पडल्याने विरोधी बाकावर आता सर्वांधिक आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आहे. राष्ट्रवादी  पक्षाकडून अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नाव चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र विरोधी पक्ष नेते पद घ्यायला फार इच्छुक नाहीत असे समजते. जयंत पाटील यांकडे प्रदेश अध्यक्ष जबबदारी आहे. त्यातच विरोधी पक्षाची जबाबदारी देणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांचंही नाव चर्चेत आहे. मुंडे यांनी या आधी विधान परिषदेत पाच वर्ष विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं होतं. आता मुंडे यांना ही मोठी जबाबदारी दिली जाते का, याची उत्सुकता आहे. 


शिवसेनेत बंडखोरी झाल्याने आता शिवसेनेकडे 16 आमदार आहेत. तर 39 बंडखोर आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीत आमदारांची संख्या आता शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून हा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे 2019 मध्ये निवडून आलेले 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे 55 आमदार आहेत. त्यातील दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत 53 आमदार मदतान करु शकतात. तसेच न्यायालयाने परवानगी दिली ते अनिल देशमुख, नवाब मलिक मतदान करु शकतात. तर काँग्रेसकडे 44 आमदार आहेत.