Rupali Thombre on MNS : महाविकास आघाडीने महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ मुंबईमध्ये आज भव्य विराट मोर्चाचं (Maha Vikas Aghadi Morcha) आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत असून काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादीचे बडे नेतेही सहभागी झाले आहेत. दुसरीकडे भाजपने (BJP) आंदोलन केलं आहे. भाजपकडून मविआच्या मोर्चावर टीका केली जात आहे. राज्यभरातून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेत. त्याआधी पुण्यातून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेवर (Rupali Thombre on MNS) निशाणा साधला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडावं आणि काय धरायचं अशी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हटलं की ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो असे लोकही राज्यापालांच्या विधानावर काही बोलले नसल्याचं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी नाव न घेता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवरही टीकास्त्र सोडलं. 


एकनाथ शिंदे यांनीही राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली होती. शिंदे यांचा ग्रुप त्यांचावर कारवाई होऊ नये म्हणून भाजपसोबत गेल्याचा आरोपही पाटील यांनी केला. मविआच्या हल्लाबोल मोर्चाला समाजवादी पक्षासह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. 


दरम्यान, मविआच्या हल्लाबोल मोर्चाला सुरूवात झाली असून तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेयासुद्धा मोर्चामध्ये उतरल्या आहेत. मोर्चाच्या सांगताला प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत. संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही शेवटी संबोधित करणार आहेत.