नागपूर - राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर नगरपंचायतीत भाजपने वर्चस्व राखले आहे. मात्र, ही ग्रामपंच्यायत त्यांच्या हातातून निसटली आहे.

 

येथे सरपंच हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुरस्कृत बसलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावात सरपंच हा आता भाजपचा नसणार आहे. हा मुख्यमंत्र्यांना मोठा हादरा मानला जात ाहे.
 

नागपूर  ग्रामपंचायत निवडणुक सविस्तर  निकाल -


फेटरीगावात काँग्रेस-राष्ट्रवादी  पुरस्कृत महिला सरपंच विजयी  झाल्या आहेत. तर  फेटरी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. 
काँग्रेस - राष्ट्रवादी पुरस्कृत धनश्री ढोमणे  300 मतांनी विजयी ठरल्या आहेत. तर भाजपच्या ज्योती राऊत  पराभूत झाल्या आहेत. 
नागपूर नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. 9 पैकी 5 सदस्य भाजपचे तर उर्वरीत ४ काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.