मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर टीका केली. राज ठाकरे यांच्यावर टीका करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्यावर टीका करतांना त्यांनी कन्यादान प्रथेवर वक्तव्य केलं. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या या वादग्रस्त विधानानंतर ब्राह्मण संघटनांनी आक्रमक झाल्या. ब्राह्मण महासंघाने पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. ब्राह्मण समाजाच्या लोकांकडून यावर संताप व्यक्त आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. 


मिटकरींचं हे भाषण सुरू असताना जोरदार हसणारे मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी आपली बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय. ब्राह्मणसमाज सावलीसारखा आपल्या सोबत असून कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं मुंडे म्हणाले. तर जयंत पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, एका लग्नाच्या संदर्भात ते बोलत होते. पण यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. ते व्यक्तिगत भाष्य होतं. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला.



राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविषयीच्या वक्तव्यावरून पुण्यात जोरदार राडा झाला. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही इथे जमा झाले. दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.