Baba Siddiqui Last Words: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे महाराष्ट्र हादरला आहे. भररस्त्यात मोठ्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड सक्रीय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तीन शस्त्रधारी हल्लेखोरांनी गर्दीच्या ठिकाणी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. यातील दोन गोळ्या त्यांच्या छातीला लागल्या, ज्या त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्या. गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दिकी यांनाही मृत्यू जवळ आल्याची कल्पना आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हल्ल्यानंतर तिथे नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे. एका कार्यकर्त्याने सांगितलं की, नमाज पठण केल्यानंतर झिशान यांनी आपल्या वडिलांना आपण खाण्यासाठी चेतना कॉलेजला जात आहोत असं सांगितलं होतं. 


Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'


 


यावर बाबा सिद्दिकी यांनी आपण दोन ते तीन मिनिटांत आपलं काम पूर्ण करुन निघू असं उत्तर दिलं. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी नौपाडा येथे एका नवीन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पिता-पुत्राची बैठक नियोजित होती. बाबा सिद्दिकी पक्षाचे कार्यकर्ते, एक पोलीस अंगरक्षक आणि चालकासह कार्यालयातून बाहेर पडले होते. ते कारजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. रिपोर्टनुसार, दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीला लागल्या आणि एक गोळी तेथून जाणाऱ्या पादचाऱ्याच्या पायाला लागली. 


'मला गोळ्या लागल्या आहेत. मी वाचणार नाही'


गोळ्या लागल्यानंतर बाबा सिद्दिकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. त्याआधी त्यांनी म्हटलं की, 'मला गोळ्या लागल्या आहेत, मी वाचणार नाही, मी मरेन'. लिलावती रुग्णालयात नेत असताना हे बाबा सिद्दिकी यांचे अखेरचे शब्द होते. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


झिशान सिद्दिकी यांची पोस्ट


वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. "माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण, बचाव करताना आपला जीव गमावला. आज माझे कुटुंब तुटलं आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. त्यांचा मृत्यू नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा," असं झिशान सिद्दिकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.