पुणे : NCP's Vaishali Nagawade assaulted in Pune : बातमी पुण्यातील राड्याची. राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नागवडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसवराज तिकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करुन शिवीगाळ करणं, धमकावणं, अश्लील हातवारे करणे याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यात महागाईच्या मुद्यावरुन जोरदार राजकीय राडा झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महागाई विरोधात (Protest against inflation) आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या कार्यक्रमस्थळी म्हणजेच बालगंधर्वमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांना मारहाण झाली.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत शहरातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. बालगंधर्व सभागृहात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे  शहरने केला आहे.


गॅस सिलिंडर दरवाढीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यार कार्यकर्त्यांसह इराणी यांना निवेदन देण्यासाठी वैशाली नागवडे गेल्या असताना भाजप कार्यकर्त्यांनी नागवडे यांच्यावर हल्ला केला. इराणी यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने सभागृहात गोंधळ झाला, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.


आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यापैकी एक, वैशाली नागवडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहात मारहाण केली. जेव्हा त्या आणि इतर लोक निवेदन देण्यासाठी गेलो होतो, असा दावा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.