चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची मागणी
या वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून तीन लाखाहून अधिक भाविक येत असतात.
सोलापूर : वारकऱ्यांचं माहेरघर असलेल्या पंढरीच्या पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करण्याचा हक्क पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर देवस्थानाने हिरावून घेतलाय. येत्या 28 मार्चला पंढरपूरमध्ये चैत्र वारी आहे. विठुरायाच्या पंढरीमध्ये भरणा-या चार महत्त्वाच्या आणि मोठ्या यात्रांमध्ये चैत्र वारीचा समावेश आहे. या वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून तीन लाखाहून अधिक भाविक येत असतात.
वारीचा सोहळा अवघ्या चार दिवसांवर
वारीचा सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी वाढू लागलीय. लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
मात्र चंद्रभागेच्या पात्रात पुरेसे पाणी नसल्याने भाविकांना पात्रात साठलेल्या घाण गटारीच्या डबक्यामध्ये स्नान करावं लागतंय. वारीपूर्वी चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडून वाळवंट स्वच्छ करावं अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.