Neeraj Grover Murder Case: प्रेमाच्या नादात जीव गमावल्याची अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, कित्येक वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या एका घटनेने अंगाचा थरकाप उडेल. मुंबईलगतच्या पॉश सोसायटीत मध्यरात्री जे घडत होतं त्यामुळं फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला. एका घरात मध्यरात्री निर्घृण हत्या झाली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या मृतदेहाचे 300 तुकडे करण्यात आले. नंतर, जे काही घडलं ते भीती घालणारे होते. 


नीरज ग्रोवर मर्डर केस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिव्हीजन एक्झिक्युटिव्ह नीरज ग्रोवर, त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री मारिया सुसाइराज व तिचा प्रियकर एमिल जेरोम मॅथ्य्यू यांची ही कहाणी आहे. 2008 मध्ये मारिया मुंबईला आली होती. तिला बॉलिवूड चित्रपटात काम करायचे होते. तिथेच तिची मैत्री नीरज ग्रोव्हरसोबत झाली. नीरजचे नाव मुंबईतील प्रोडक्शन हाऊसमध्ये खूप लोकप्रिय होते. नीरज नेहमी मारियाची मदत करायचा त्याच दिवसांत दोघेही खूप जवळ आहे. मात्र मारिया आणि नीरजची मैत्री तिच्या प्रियकराला मात्र भटकायची. असं असतानाही ते दोघे सतत एकमेकांना भेटायचे. 


मारियाचा प्रियकर एमिल जेरोम मैथ्यू नेव्हीमध्ये ऑफिसर होता. मारियाने मालाडमध्ये घर भाड्याने घेतले होते. तिला घराची शिफ्टिंग करण्यात नीरजने मदत केली होती. त्या रात्री मारिया आणि नीरज तिच्याच घरी थांबले होते. तेव्हाच मारियाचा प्रियकर मैथ्यूचा रात्री साधारण 8 वाजता तिला फोन आला. फोनवर बोलत असताना त्याला नीरजचा आवाज आला.  तेव्हा त्याने नाराज होत नीरजचा घरी जाण्यास सांगितले. मात्र, मारियाने त्याचे काहीच ऐकले नाही. त्यारात्री नीरज मारियाच्याच घरी थांबला होता. 


6 मे 2008ची ती भयानक रात्र


मुंबईमध्या मारिया आणि नीरज फ्लॅटमध्ये असतानाच तिथे कोच्ची येथे मारियाचा प्रियकर या घटनेमुळं संतापला होता. त्याने मध्यरात्री कोच्चीवरुन मुंबईला येण्यासाठी फ्लाइट पकडली आणि थेट मारियाच्या घरी पोहोचला. तिथे मारिया आणि नीरजचा एकत्र पाहून तो संतापला होता. त्याचवेळी नीरज आणि मैथ्यूमध्ये मारहाण झाली. मारियादेखील त्यावेळी तिथेच होती. याच मारहाणीत मैथ्यूने नीरजवर चाकूने वार केला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. 


लव्ह ट्रॅंगलमध्ये हत्या 


नीरजच्या मृत्यूनंतर मारिया मॅथ्यै दोघे घाबरले. नीरजचा मृतदेह समोर होताच . त्यावळी मैथ्यूच्या डोक्यात एक प्लान तयार झाला. त्याने आणि मारियाने नीरजच्या मृतदेहाचे 300 तुकडे केले आणि प्लास्टिकच्या पिशवीत हे तुकडे भरले. त्यानंतर मारियाने तिच्या एका मित्राची कार घेऊन आली. दोघांनी मिळून मृतदेहाचे तुकडे एका मोठ्या बॅगमध्ये भरुन कारमध्ये ठेवले आणि जंगलाच्या दिशेने रवाना झाले. जंगलात गेल्यानंतर त्यांनी मृतदेहाच्या तुकड्यांवर पेट्रोल टाकून जाळून टाकले. जेणेकरुन पुरावा मिटवता येईल. 


घरातून पुरावे मिटवले


घरात हत्या झाल्याने फरशीवर रक्ताचे डाग तसेच होते. दोघांनी मिळून घराचा सर्व चेहराच बदलून टाकला. घरातील कलर, चादर इतकंच नव्हे तर फर्निचरदेखील बदलून टाकले. नवीन घरात शिफ्ट झाल्याने कोणालाच त्यांच्यावर संशय आला नाही. हत्येनंतर कित्येत दिवस ते काहीच घडले नाही अशा अविर्भावात वावरत होते. दोघांनी हत्येचे सगळे पुरावे मिटवले. रात्री फ्लॅटमध्ये काय झालं हे कोणालाच समजले नाही. 


दुसरीकडे नीरजच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रय़त्न केला. मात्र त्याच्यासोबत काहीच संपर्क होत नव्हता. शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हायप्रोफाइल केस असल्याने सगळेच अलर्ट वर होते. मात्र खूप शोधल्यानंतरही कुठेच त्याचा मृतदेह, पुरावे सापडले नाहीत. 


मारियामुळंच उघडकीस आला गुन्हा


हत्येच्या कित्येक दिवसांनंतर मारिया पोलिस स्थानकात आली आणि तिच्याकडे असलेला नीरजचा मोबाइल फोन पोलिसांकडे सोपवला. त्यानंतर मारियाविरोधात चौकशी सुरू झाली. मात्र ती सतत तिचे जबाब बदलत होती. मारियाच्या सतत जबाब बदलत राहिल्याने पोलिसांचा तिच्यावरील संशय वाढत गेला. पोलिसांनी जास्त दबाव टाकल्यानंतर तिने नीरजबाबत सगळं काही सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मारिया आणि तिच्या प्रियकराला अटक केले. 


सोसायटीच्या गार्डने दिली साक्ष


कित्येक वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होते. मृतदेहच नसल्याने केस सिद्ध करण्यास पोलिसांसमोर आव्हान होते. तर, दुसरीकडे हायप्रोफाइल केस असल्याने पोलिसांवर दबाव होता. 2008 मध्ये या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. शेवटी पोलिसांना एक साक्षीदार सापडला. सोसायचीच्या गार्डने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. गार्डने सांगितले की, त्या रात्री मारिया आणि तिच्या प्रियकराला एक मोठी बॅग गाडीत ठेवताना पाहिले. त्यानंतर पोलिसांनी मैथ्यूची कॉल डिटेल आणि फ्लाइट डिटेलदेखील तपासले. तेव्हा  नीरजच्या हत्येत या दोघांचाच हात असल्याचे स्पष्ट झाले. जंगलातून नीरजची हाडे व दातदेखील पोलिसांना सापडले. 


2011 मध्ये अखेर या हायप्रोफाइल केसमध्ये कोर्टाने आपला निर्णय सुनावला होता. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडवला होता. मैथ्यूला हत्येचा पुरावे मिटवण्याच्या आरोपांखाली 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तर, मारियाला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सध्या मारिया तीची 3 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आली आहे.