सोनू भिडे, नाशिक- राजकीय क्षेत्रात काका पुतण्या हा नेहमीच राजकीय वाद रंगला आहे पुतण्याने नेहमीच काकावर कुरघोडी करत आखाडा रंगवल्याचे आपण नेहमी पाहतो मात्र नाशिक जवळील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगूर शहरात राहणारे काका पुतण्याच्या बाबतीत मात्र वेगळेच काही घडले. काकाच्या घरात घरपोडी करत पुतण्या मालामाल झाल्याचं उघड झालंय. हा अजब प्रकार नाशिक पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण हे काका 


अशोक दगडू बिरछे...बटाटा विक्री व्यवसायिक. बटाट्यांची विक्री करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात.  भगूर येथील मोठा गणपती जवळील इंदीरा संकुल येथे राहतात. रविवारी (२४ जुलै) ला अशोक बिरछे घराला लॉक करून बटाटे विक्री करण्यासाठी बाजारात गेले होते. घरात कोणी नसल्याच बघून चोराने अशोक यांच्या त्यांच्या घराच्या खिडकीचा गज कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात   ठेवलेले १ लाख ८६ हजार ७७० रुपये काढून चोर पसार झाला. अशोक बिरछे हे घरी आल्यानंतर त्यांना कपडे अस्तव्यस्त दिसले. कपाटात ठेवलेले पैसे न दिसल्याने अखेर अशोक यांनी देवळाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.  याप्रकरणात देवळाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. 


कसा आला पुतण्या जाळयात


पोलिसांनी घटनास्थळी  घराची पाहणी केली चोरीचा एकूण प्रकार बघता माहितगार माणसाने चोरी केल्याचं लक्षात येत होतं. त्यामुळे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घराजवळील नागरिकांची चौकशीही केली. घराच्या अंतरात जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता रविवारी एक संशयित व्यक्ती घराजवळ फिरताना दिसत होता. त्यांनंतर गावात शोध घेतला असता सीसीटीव्हीत व्यक्ती सारखा  साम्य असलेला एक जण स्वागत हॉटेल जवळ पेंटिंगचे काम करत होता. या व्यक्तीला ताब्यात घेत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला काही संबंध नसल्याचे म्हटले.मात्र सीसीटीव्हीत स्वतःला बघताच त्याचा चेहरा पडला . पोलिसांनी आपला इंगा दाखवितात  अविनाश बिरछे याने चोरी केल्याची कबुली दिली.  अशोक बिरछे यांच्यासमोर जेव्हा या व्यक्तीला हजार केले त्यावेळी तेही अवाक झाले कारण ही तसेच होते चोर दुसरा तिसरा कोणी नसून अशोक बिरछे यांचा चक्क पुतण्या होता. पोलिसांनी अखेर उलगडा होताच काकांच्या सहमतीने पुतण्याअविनाशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.